नाशिक – शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असताना शहरात फिरणा-या दोन तडीपारावर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विवेक उर्फ विकी विजय हांडोरे (वय २५, रा. प्राईड ॲव्हेन्यू, विहितगाव) यास पोलिस आयुक्त परीमंडळ (विभाग २) यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते. या आदेशाचे उल्लंघन करून तो रविवारी दत्तमंदिर परिसरात फिरत होता. त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबई पोलिस कायदा १९५१ चे कलम १४२ अन्वये कारवाई केली. तर समीर मुन्ना शहा (वय २४, रा. भारतनगर) यास परीमंडळ (विभाग एक) यांनी २१ सप्टेंबर २०२१ रोजी एक वर्षाच्या कालावधीसाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. तो रविवारी भारतनगरमधील मदरश्यानजिक फिरताना आढळला. त्यास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मुंबई पोलिस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.