नाशिक – मुंबईतील भाजीपाला व्यापा-याला शिवागाळ करुन त्याची मारुती कार पळवून नेल्याप्रकरणी चौघावर आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता कुटे, कल्पेश शिंदे, गणेश शिंदे, अशी संशयितांची नावे आहे. कल्याण येथील सागर विश्वनाथ आगळे यांनी या घटनेबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, मित्रासोबत १६ ऑगस्टला त्यांची मारुती कारमधून कल्याणहून नाशिकला आडगाव येथे भाजीपाला खरेदीला आलो होतो. त्यातील दत्ता कुटे याने इगतपुरीला जेवायला जाऊ असे सांगून त्याच्या गाडीत चौघांसह बसवले. त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर आडगाव येथील कृष्णा हॉटेल जवळ अंधारात गाडी थांबवायला सांगून जातीवाचक शिवीगाळ करीत चाकूचा धाक दाखवित गाडीतून उतरवून दिले. त्यानंतर त्याची गाडी त्यातील सहाशे रुपये घेऊन चौघे फरार झाले. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.