नाशिक – मेन रोडला सायकल दुकानात चोरी; ७५ हजाराचे साहित्य चोरट्यांनी केले लंपास
नाशिक – मेन रोड येथे मधुकर चित्रपटगृहाशेजारी व्ही.एम.पारख ॲण्ड कंपनी या सायकल दुकानीतून शनिवारी रात्री चोरट्यांनी सुमारे ७५ हजाराचे सायकलचे साहित्य चोरुन नेले. चोरट्यांनी दुकानाची खिडकी तोडून दुकानात प्रवेश करीत सव्वाशे सायकलेच प्री व्हील, ९० सायकलच्या चेन, सायकलचे गियरचे पार्ट, ३० सायकलचे ट्युबयासह असे सायकलचे साहित्य चोरुन नेले. याप्रकरणी शिऱीष विठ्ठलराव पारख यांच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या चोरीचा सहाय्यक पोलिस निरीक्षक के. पी. खांडवी तपास करीत आहेत
महिलेच्या हातातील मोबाईल पळवला
नाशिक – दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी महिलेच्या हातातील मोबाईल पळविल्याची घटना पंचवटीतील तपोवण येथे घडली आहे. या चोरीप्रकरणी प्रमिला जितेंद्र जाधव यांनी तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, शुक्रवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास काठे गल्लीतील लक्ष्मीनारायण मंदीराजवळून मोबाईल वर बोलत जात असतांना पाठीमागून पांढऱ्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी हातातीतल मोबाईल हिसकावून पळून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतनगर परिसरात ५० हजाराची घरफोडी
नाशिक – घरफोडी करीत चोरट्यांनी भारतनगर परिसरात ५० हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसुफ सिध्दीक शेख (वय ३०, भारत नगर) यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री घरी झोपले असतांना रात्रीतून चोरट्यांनी घरात प्रवेश करुन ३ ग्रॅमचे सोन्याचे दागिणे, दोन मोबाईल, घराचे कागदपत्र, २२ हजार रुपयाची रोकड असा पन्नास हजाराहून अधिक रक्कमेचा ऐवज चोरुन नेला. या चोरीप्रकरणात हवालदार आर.व्ही. सोनार तपास करीत आहेत.