नाशिक – आडगाव मेडीकल कॉलेज परिसरात दुचाकी स्लीप होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यु
नाशिक – आडगाव मेडीकल कॉलेज परिसरात दोन दिवसांपूर्वी दुचाकी स्लीप होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. पुंडलिक मुरलीधऱ शेंडे ) वय ५२, कोणार्कनगर आडगाव असे अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी मृत पुंडलिंक शेडे हे गुरुवारी (दि.६) रात्री अकराच्या सुमारास दुचाकी स्लीप झाल्याने तोल जाऊन पडले त्यात त्यांना उपचारासाठी आडगाव मेडीकल कॉलेज येथे दाखल केले असता, डॉ. वैभव माळी यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.
जुन्या सीबीएस स्थानकात बेवारस महिलेचा मृत्यु
नाशिक – नाशिकला जुन्या सीबीएस स्थानकात बेवारस महिलेचा मृत्यु झाला आहे. शुक्रवारी (दि.७) सायंकाळी पाचच्या सुमारास बेवारस महिला बेशुध्द असल्याचे लक्षात आल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. पाटील यांनी मृत घोषीत केले. शंभर दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप असून त्यामुळे गर्दी नसलेल्या स्थानकात महिला रहात होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली.
राजीवनगर नाल्याजवळ एकाचा मृतदेह आढळून आला
नाशिक – इंदिरानगर परिसरातील सदिच्छानगर भागात राजीवनगर नाल्याजवळ एकाचा मृतदेह आढळून आला आहे. दत्तात्रय तात्याराव सावंत (वय ५५, वडाळा पाथर्डी रोड) असे मृताचे नाव आहे. सावंत यानी शुक्रवारी (दि.७) दुपारी एकच्या सुमारास राजीवनगर जवळील नाल्याजवळ तो मृतावस्थेत आढळला. दारुच्या नशेत असतांना तो मृतावस्थेत आढळल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.
गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक – पंचवटीत पेठ रोड वरील ढगे टॉवर भागात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. रामकृष्ण वामनराव ढगे (वय ४५, ढगे टॉवर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ढगे यानी शुक्रवारी (दि.७) सातच्या सुमारास घरातील बेडरुममधील सिलींग पंख्यांच्या हुकला नायलॉय दोरीने गळफास घेतल्याचे आढळले. पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.