नाशिकरोड – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दोघा कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही कैद्यावर गुन्हे दाखल केले आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षाबंदी विजयकुमार आनंदकुमार रॉय याने खिशात लपवून आणलेला पत्र्याचा तुकड्याने स्वतःच्या डाव्या हातावर वार करुन घेतले. तर निफाड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील न्यायाधीन बंदी सागर राहुल जाधव याने कडुनिंबाच्या झाडावर दोरी बांधून आत्महत्या करण्याची धमकी दिली. या दोघांविरुध्द नाशिकरोड पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.