नाशिक – अती मद्य सेवनाने एकाचा मृत्यु
नाशिक – नाशिक रोडला देवळाली गावातील धनगर गल्लीत अती मद्य सेवनाने एकाचा मृत्यु झाला. संतोष कोंडाजी वाघ (वय ४६, धनगर गल्ली दे.गाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी मंगळवारी (ता.४) दुपारी पावने चारला संतोष कोंडाजी वाघ याने अती मद्य सेवन केल्याने बेशुध्द झाला. त्याला उपचारासाठी महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉ. हरेश्वर यांनी मृत घोषीत केले.
गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक – जलसंपदा कार्यालयासमोरील क्रांतीनगर भागात गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. अर्जुन गोपाल किरकिरे (वय २१, क्रांतीनगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी (ता.४) जिल्हा रुग्णालयात छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबई नाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.