नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना हनुमाननगर भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिराबाई भास्कर सोनवणे (५१ रा.रूख्मिनी लॉन्स समोर,मित्र विहार कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे या सोमवारी (दि.३) दुपारच्या सुमारास हनुमाननगर येथे जात असतांना ही घटना घडली. गोरक्षनाथ आश्रम समोरून त्या पायी जात असतांना आश्रमाच्या काही अंतरावरच समोरून येणा-या दुचाकीस्वारांनी आपले वाहन सोनवणे यांच्या अंगावर घालून सुमारे ३० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तोडकर करीत आहेत.