नाशिक – म्हसरूळ – दिंडोरी रोड वरील दोन वॅाईन शॅाप फोडून चोरट्यांनी लाखाच्या रोकड सह दारूवर डल्ला मारला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रितम राजेंद्र चौधरी ( रा.पाईपलाईन रोड गंगापूर रोड) यानी तक्रार दाखल केली आहे. दिंडोरी रोडवरील अमित वाईन व दिंडोरी लिकर हे दोनही वाईन शॉप अज्ञात संशयितांनी फोडल्याची प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आहे. सदर संशयित एवढा बिनधास्त आहे की, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असून देखील चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. अज्ञात चोरट्याने दोनही वाईन शॉप मिळून एकूण सात लाख पंचेचाळीस हजार रुपये लंपास केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी रोड मुख्य रस्त्यालगत अमित वाईन व दिंडोरी लीकर असे दोन वाईन शॉप आहेत.या दोन ही वाईन शॉप मध्ये देशी व विदेशी मद्य विक्री होते.रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दिंडोरी रोड वरील भवानी पॅलेस मधील शॉप न .२ येथील अमित वाईन सुमारे ३.४५ ते ४.३० वाजता कश्याच्या तरी सहाय्याने शटर वाकवून दुकानात प्रवेश करीत गल्ल्यात असलेली व इतरत्र ठेवलेली जवळपास सहा लाख ८५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. तसेच दिंडोरी वरील संस्कृती अपार्टमेंट शॉप न.२ येथील दिंडोरी लिकर हे देखील आस्थापना बंद करणे वेळी आपले दुकान बंद करून घरी निघून गेले होते. या वाईन शॉप मध्ये सुमारे रात्री एक ते तीन वाजेच्या दरण्यान अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने शटर वाकवून जवळपास ६० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.कायम रहदारी असलेल्या रस्त्यालगत झालेल्या या धाडसी चोरीने परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे