नाशिक – विवाह करीत नाही तर प्रेमसंबध तरी ठेव यासाठी तीन वषार्पासून एका विवाहिलेता व्हॉटसग्रुप बनवून बदनामीची धमकी देणाऱ्या एकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. इफ्तसम तैय्यब खान (सोमेश्वर कॉलनी सातपूर) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेस संशयिताने २०१९ पासून जानेवारी २०२० कॉलेज रोड भागात विसे मळा भागात श्रमिकनगर पर्यतच्या तिच्या कार्यालयाच्या रस्त्यावर नियमितपणे पाठलाग करुन विवाह कर नाही तर प्रेमसंबध तरी ठेव यासाठी ब्लॅकमेल करीत होता. शनिवारी (दि.१) सायंकाळी साडे सातला बाईज टॉउन वळणावर शिवीगाळ करीत दमबाजी केली. व्हॉटसअप ग्रुपकरुन बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.