नाशिक – सिध्दार्थनगरला युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अर्जुन पुंडलिक दाभाडे सिध्दार्थनगर असे संशयिताचे नाव आहे. तक्ररादार महिलेची पुतनी त्यांच्या घराच्या मागे मैत्रीणीची वाट पहात असतांना संशयिताने तिला घरात बोलावून तिचा बळजबरीने हात धरुन घरात बोलावून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.