नाशिक – वडिलोपार्जित मिळकतीतून बहिणीच्या नावाची नोंद कमी करीत फसवणूक केल्याप्रकरणी वैजापूर येथील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शेख इकबाल शेख मुनीर शेख (वय ५२) शेख रईस शेख इकबाल (वय २८) गुरुदत्त कॉलनी शिवराई रोड वैजापूर औरंगाबाद) अशी संशयितांची नावे आहे. याप्रकरणी इर्शादबी नरुमोहम्मद शेख (गोजरेजवाडी सिन्नरफाटा) यांच्या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. देवळाली गाव परिसरातील सीटी सर्व्हे ६६०० व ६६९५ या वडिलोपार्जित मिळकतीत कायदेशीर वारस म्हणून नावाची नोंद करण्यासाठी खोटे दस्तऐवज तयार करीत लहान बहिण मुमताज नुरफीक पानसरे यांची संमती न घेता फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.