नाशिक – जेल रोड टाकळी रोड मार्गावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. नंदकुमार सिध्दार्थ भालेराव असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी (दि.३१) रात्री साडे नऊच्या सुमारास नंदकुमार सिध्दार्थ भालेराव व त्यांचे बंधू प्रशांत हे त्यांच्या दुचाकीवरुन निलगिरी बागेकडून जेल रोड टाकळी रोडच्या दिशेने जात असतांना औरंगाबाद मागार्ने जात असतांना टाकळी एसटीपी प्लांटजवळ अशोल लेलंड टेम्पो (एमएच १५ एफव्ही ९०८३) च्या धडकेत दुचाकी वरील नंदकुमार भालेराव जखमी झाले. उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.