नाशिक – पंचवटीतील हिरावाडीत घरफोडी; साडे सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक – पंचवटीतील हिरावाडीत शिवमनगरला घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे सात लाखांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी नलीन बाबुभाई पटेल (वय ५४, शिवमनगर, हिरावाडी ) यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवमनगर भागात मंगळवारी (ता.२८) रात्रीतून चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे ब्रॅकेट लॉक करुन आतल्या बाजूला लॅच तोडून घरात प्रवेश करीत दोन्ही बेडरुममधील दोन्ही गोदरेज कंपनीचे लोखंडी कपाट कशाचे तरी सहाय्याने तोडून त्यातील ५० ग्रॅमचा सोन्याचा हार, ४० ग्रॅमचे सोन्याचे ब्रासलेट, ४० ग्रॅमच्या सोन्याच्या पाटल्या, १० ग्रॅमच्या सोन्याच्या कानातील रिंग, ३५ ग्रॅमचे सोन्याची चेन, २० ग्रॅमची सोन्याची चेन, ३० ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, कानाच्या बुटी, २० ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, २० ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, २० ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, १० ग्रॅमच्या सोन्याच्या कानातील रिंगा, २० ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, सोन्याच्या प्लेटा असलेल्या बांगड्या १५ हजाराची रोकड असा सुमारे साडे ७ लाखांहून आधीकचा ऐवज घरफोडीत लंपास केला.
पाणी भरण्याच्या कारणावरुन भांडण; एकाने महिलेला केली मारहाण
नाशिक – पाणी भरण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणानंतर एकाने महिलेला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. आकाश भास्कर भुतेकर (संत कबीर नगर, गंगापूर रोड) असे संशयिताचे नाव आहे. गुरुवार (ता.३०) बाराच्या सुमारास मॉडेल कॉलनीत पाणी भरण्यावरुन वाद झाला त्यानंतर तक्रारदार शिला रमेश लहाणे (वय ३०, संत कबीर नगर) या गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी जात असतांना संशयित आकाश भास्कर भुतेकर (संत कबीर नगर) यांनी रस्त्यात अडवून मारहाण केली यावरुन गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.