व्हिडिओ क्लीप तयार करून महिलेला ब्लॅकमेल, गुन्हा दाखल
नाशिकः ओळखीचा गैरफायदा घेत महिलेवर तीच्या इच्छेविरूद्ध अत्याचार केल्याचा तसेच याची व्हिडिओ क्लीप तयार करून ब्लॅकमेल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन वसंत वाघ (४४, रा. वावरे लेन, रविवार कारंजा) असे संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता याच परिसरात राहत असून तीच्या ओळखीचा गैरफायदा घेत संशयित वाघ हा ऑक्टोबर २० पासून आतापर्यंत वेळवेळी त्र्यंबकेश्वर, निफाड तसेच राहते घरी तीच्यावर अत्याचार केले. तसेच याची व्हिडिओ क्लीप बनवून तीला ब्लॅकमेल करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात वाघ विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक कोल्हे करत आहेत.
…..
एकावर चाकू हल्ला
नाशिकः जुन्या भांडणाच्या वादातून तिघांनी एकास बेदम मारहाण करत डोक्यावर चाकूने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) रात्री जुने नाशिकच्या नानावली भागात घडली. निहाल निसार शेख (४१), इस्तियाज शेख, साहिले शेख रा. नानावली, भद्रकाली) अशी हल्ला करणार्या सशिंयतांची नावे आहेत. याप्रकरणी मोहमंद अन्वर सैय्यद (२७, रा. जुने नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयितांनी त्यांना दुचाकी आढवून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच निहाल याने चाकूने त्याच्या डोक्यात दोन वार केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक जाधव करत आहेत.
…..