नाशिक – मखमलाबाद परिसरात व्यायाम करत असतांना ३० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली, सोनल आव्हाड (३०) असे या महिलेचे नाव असून त्या नियमीतपणे प्राणायाम करीत असत. आज सकाळी त्या नेहमीप्रमाणे प्राणायाम करत होत्या. यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. काही वेळांनंतर त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सोनल यांना आधीच हृदयविकाराचा त्रास असावा किंवा आज अचानक वाढलेल्या थंडीमुळे त्यांना अधिक त्रास झाला असावा असा अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.