नाशिक : सोशल मीडियाद्वारे अश्लील, आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उद्धव बाबूराव निमसे (रा. नांदूर दसक) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी राजू मधुकर करंडे (रा. जनार्दननगर, नांदूर नाका) याने व्हॉट्सअॅप क्रमांक व फेसबुकवरून सोशल मीडिया माध्यमाद्वारे फिर्यादी निमसे व त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध अश्लील, घाणेरडे, आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूर फोटोसह प्रसारित केला.तसेच या पोस्टमध्ये परिसरातील नागरिकांना टॅग करून अश्लील व बदनामीकारक मजकूर वाचण्याचा तसेच राजकीय प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने कृत्य केले म्हणून सायबर पोलीस ठाण्यात राजू करंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली करीत आहेत.