नाशिक : हॉटेलमधील रूम पाहण्यासाठी गेलेल्या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हॉटेलमालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की मयत मयत सुखदेव गिते (वय ३१) हा युवक २६ डिसेंबर रोजी पाथर्डी फाट्यावरील हॉटेल एक्सलन्सी येथे रूम पाहण्यासाठी गेला होता. दरम्यान, हॉटेल मालक मनोज गंगाधर बुरकुले यांनी हॉटेलच्या पाठीमागील बाजूस बेसमेंट पार्किंगचे काम सुरू केले आहे. त्याकरिता त्यांनी पहिल्या मजल्यावरील रूमच्या गॅलरीसमोर काटकोनात स्लॅब, लोखंडी रेलिंग, सिमेंट भिंत तोडलेली होती. या ठिकाणी सुरक्षा म्हणून बॅरिकेड्स किंवा फलक लावलेले नव्हते.
दरम्यान याच कारणामुळे फिर्यादी सुखदेव मुरलीधर गिते (रा. कालभैरव चौक, सावतानगर, सिडको) यांचा मुलगा विनोद हा तोडलेल्या रेलिंगच्या मोकळ्या जागेतून खाली पडून मरण पावला. यामध्ये हॉटेल मालक मनोज बुरकुले, हॉटेल मॅनेजर अजिंक्य जितेंद्र पवार यांचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
https://fb.watch/ac2CNTK3Jr/