नाशिक – अंबडला कंपनी परिसरात चोरीच्या संशयावरुन एकाला अटक
नाशिक – अंबडला कंपनी परिसरात चोरीच्या संशयावरुन एकाला अटक केली आहे. इम्रान ईस्माईल शेख (वय ३६, सातपूर कॉलनी, शिवनेरी गार्डन जवळ सातपूर) असे संशयिताचे नाव आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पोलिस गस्ती दरम्यान संशयित अंबड औद्योगिक वसाहतीतील ब्लू प्लेशर वायर ॲण्ड केबल कंपनीच्या प्लॉट क्रमांक १४ च्या कंपाउंडच्या भिंतीजवळ घरफोडीच्या उद्देशाने लपून बसल्याचे लक्षात आले तर दुसऱ्या घटनेत डीजीपीनगर माऊली लॉन्स भागात विजय प्रल्हाद आव्हाड (वय २०,) याला चोरीच्या संशयावरुन अंबड पोलिसांनी अटक केली. दोघांविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक – कलानगर भागात चक्कर येउन पडल्याने एकाचा मृत्यु
नाशिक – गंगापूर रोड वरील केटीएचएम महाविद्यालयाच्या परिसरातील कलानगर भागात चक्कर येउन पडल्याने एकाचा मृत्यु झाला. सुखदेव भिवा डंबाळे (वय ४५, गाळोशी ) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी (ता.२८) दुपारी एकच्या सुमारास राजेंद्र पाटील यांच्या बंगल्याजवळ तो काम करीत असतांना चक्कर येउन पडला. त्यात, डोळे आणि नाकाजवळ खरचटल्याने त्याला ठेकेदार राजेश चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. पगार
यांनी मृत घोषीत केले.
देवळाली गावात आत्महत्या
नाशिक – देवळाली गावात धनगर गल्लीत गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. मोहन जगन्नाथ शिरसाठ (वय ६७, धनगर गल्ली दे.गाव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे मंगळवारी (ता.२८) सकाळी अकराच्या सुमारास धनगर गल्लीत राहत्या घरी टेरेसवर लोखंडी ॲंगलला गळफास घेउन आत्महत्या केल्याचे लक्षात आले. त्यांना उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉ. पटेल यांनी मृत घोषीत केले.