व्ही.एन. नाईक संस्थेशी संबध नसणा-यांने नोकरीच्या नावे केली फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकः व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेशी काहीही सबंध नसताना अनेकांना संस्थेत नोकरी लावून देतो असे सांगत फसवणूक करणारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता शिवाजी आव्हाड (रा. खुटवडनगर) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी संस्थेचे हेमत धात्रक यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित आव्हाड यांच्या संस्थेशी काहीही सबंध नसताना त्यांनी संस्थेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवत वर्षा प्रशांत सातवेकर यांची एक लाखाची फसवणूक केली तसेच इतर अनेकांची फसवणूक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक पाथरे करत आहेत.
….
विवाहिता छळ प्रकरणी १२ जणांवर गुन्हे
नाशिकः माहेरून १० लाख रूपये आणावेत यासाठी विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ करून तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पतीसह १२ सासरच्या जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलदिप जाधव व इतर ११ (रा. सर्व बीड बायपासरोड, औरंगाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी गंगापूर परिसरात राहणार्या पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार २०१८ पासून आक्टोंबर २०२० पर्यंत पती जाधव व त्याचे कुटुंबिय माहेरून १० लाख रूपये आणावेत यासाठी विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ करत होते. तीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक बैसाणे करत आहेत.
…..