नाशिक : शहरात वाहनचोरीची मालिका सुरू असून वेगवेगळया भागातून नुकत्याच दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी भद्रकाली आणि गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
संदिप नारायण देवतवाल (रा.भुजबळ फॉर्मजवळ,सिडको) हे शनिवारी (दि.२५) नाताळ निमित्त त्र्यंबकनाका भागात आले होते. पिनॅकल मॉल समोर त्यांनी आपली एमएच २० इएस ६८८१ दुचाकी पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक सुर्यवंशी करीत आहेत. दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर येथे घडली. मनोज बंकट राठोड (रा.गणेश वंदन रो हाऊस, धर्माजी कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राठोड यांची शाईन मोटारसायकल एमएच २० एफटी ८४३५ गेल्या शुक्रवारी (दि.१७) घरासमोरील मोकळय़ा जागेत पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक बागुल करीत आहेत.