नाशिक – तोंड धुण्याचा बहाणा करत नाशिक मध्ये एक आरोपी पोलिस हवालदाराच्या हाताला झटका देऊन फरार झाला आहे. फरार झालेल्या आरोपीचे नाव अमोल साळुंखे असून गुन्हयाचा तपास करण्यासाठी साळुंखे आणि त्याच्या सोबत अजून एका आरोपीला मुंबई नाका पोलीस स्टेशनला आणले होते. या आरोपीला गुन्ह्यात मंगळवारी कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज गुन्ह्यातील तपास करण्यासाठी द्वारका पोलीस चौकीत आणले होते. यावेळी तोंड धुण्याचा बहाणा केला. तोंड धुण्यासाठी बेसिन जवळ गेल्यावर पोलीस हवालदाराच्या हाताला झटका देऊन फरार झाला आहे. याबाबत मुबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.