नाशिक : दुचाकीवर प्रवास करणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र भामट्याने ओरबाडून नेल्याची घटना औद्योगिक वसाहतीतील कामगारनगर भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुचिता सोपान एरंडे (५१ रा.सुयोग कॉलनी,कामगारनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. एरंडे या गेल्या ३० ऑक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास एमएच १५ जीयू २४३१ या ज्युपिटर दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. सुयोग कॉलनी रोडने त्या आपल्या घराकडे प्रवास करीत असतांना पाठीमागून विना नंबर भरधाव आलेल्या दुचाकीवरील चालकाने त्यांच्या गळय़ातील सुमारे ५२ हजार ८६३ रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.