नाशिक – बसमध्ये बसल्यावर चक्कर येऊन पडल्याने तामीळनाडू येथील महिलेचे निधन
नाशिक – नाशिक रोड रेल्वे स्थानकाबाहेर बसमध्ये बसल्यावर चक्कर येऊन पडल्याने तामीळनाडू येथील महिलेचे निधन झाले. गंगा कृष्णा सानी चंद्रमैली (वय ६९, श्रीरंगम, तिरुचिरापल्ली तामीळनाडू) असे मृत महिलेचे नाव आहे. काल मंगळवारी (ता.२१) रात्री पावने नऊच्या सुमारास त्या नाशिक रोड रेल्वेस्थानकावर उतरल्या तेथून बाहेर पडून बस
मध्ये बसल्यावर त्या चक्कर येउन पडल्याने उपचारासाठी महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉ. गायकवाड यांनी मृत घोषीत केले.
कामटवाडा येथे युवकाची आत्महत्या
नाशिक – कामटवाडा परिसरात घरातील पंख्याला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. अनिल तानाजी मटाले (वय ३०, प्रथमेश पार्क धन्वंतरी कॉलेज मागे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. काल मंगळवारी (ता.२१) नऊच्या सुमारास राहत्या घरी बेडरुममधील सिलींग फॅनच्या हुकाला बेडशीडने गळफास घेउन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, हवालदार राऊत तपास करीत आहे.