नाशिक – देवळाली कॅम्पमध्ये इमारतीच्या गॅलरीतून पडल्याने युवकाचा मृत्यु
नाशिक – देवळाली कॅम्पला रेणुका सोसायटीत इमारतीच्या गॅलरीतून पडल्याने युवकाचा मृत्यु झाला. इरफान लतीफ शेख (वय ३०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. काल मंगळवारी (ता.२१) रात्री साडे दहाच्या सुमारास इमारतीच्या गॅलरीतून तोल जाउन पडल्याने डोक्याला गंभीर मार लागला त्याला उपचारासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात दाखल
करण्यात आले डॉ. होनराव यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस.एम.पानसरे तपास करीत आहे.
गुलमोहरनगरला घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या
नाशिक – म्हसरुळ शिवारातील गुलमोहरनगरला घरी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. दीपक पोपट चंद्रमोरे (वय ४१ स्वामी समर्थ अपार्टमेट) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. काल मंगळवार (ता.२१) रात्री दहाच्या सुमारास स्वामी समर्थ अपार्टमेट येथे राहत्या घऱी मृत दीपक याने घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेउन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांचा भाऊ समाधान चंद्रमोरे यांच्या माहीतीवरुन म्हसरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. हवालदार ए.डी.सोनवणे
तपास करीत आहेत.