तडीपार गुंडास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपार गुंडास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई पंचशिलनगर भागात करण्यात आली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर हमीद शहा (२६ रा.गंजमाळ) असे अटक केलेल्या संशयीत तडीपाराचे नाव आहे. शहा याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर आणि जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच होता. गुरूवारी (दि.२०) तो पंचशिलनगर येथील रॉयल हॉटेल भागात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्याने सापळा लावला असता तो पोलीसांच्या जाळयात अडकला. याप्रकरणी संजय पोटींदे या पोलीस कर्मचा-याने दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक सय्यद करीत आहेत.
…..
डंम्परच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
नाशिक : भरधाव डंम्परने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल भागात झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात डंम्पर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष पाटील असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी जखमीचा मुलगा रोहित पाटील (रा.विघ्नहर्ता गणपतीमंदिरामागे, डिजीपीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पाटील गुरूवारी (दि.२०) डीजीपीनगर क्र.१ येथून साईनाथ चौफुलीकडे आपल्या दुचाकीवर एमएच १५ डीपी ७७२९ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या १ नंबर गेट भागात समोरून भरधाव आलेल्या डंम्परने एमएच १५ जीयू ९९४७ दुचाकीस धडक दिली. या अपघातात पाटील जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी डंम्परचालक शेख निजाम शेख मोहम्मद (रा.चुंचाळे शिवार,सातपूर) याच्याविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार क्षिरसागर करीत आहेत.
….