नाशिक – सातपूरला अशोकनगर भागातील जाधव संकूल परिसरात घरफोडीत चोरट्यांनी ८४ हजाराचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. गगन विहार अपार्टमेंट परिसरात चार महिण्यापूर्वी २ व ३ आॅगस्ट दरम्यान रात्रीतून केव्हातरी चोरट्यांनी कैलास तुकाराम राठोड (वय ४७, गगन विहार, जाधव संकूल) यांच्या बंद घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत घरातील आकरा ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, चार ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, पाच ग्रॅमचे कर्णफूल, चार ग्रॅमचे सोन्याचे कुडक असा सुमारे ८५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.