महात्मानगरला भऱदिवसा चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरल्याचा प्रकार
नाशिक – महात्मानगरला भऱदिवसा चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अभिजीत शिवाजी तांबे (वय २१) यांच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी -अभिजीत तांबे हे महात्मा नगरला श्री अपार्टमेंटमध्ये रहायला असून सोमवारी (दि.१३) दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या प्लॅटचा अर्धवट दरवाजा उघडा असतांना घरात घूसून चोरट्यांनी घरातील डेल कंपनीचा आय पाच विंडोज सिरीजचा तर दुसरा एसर कंपनीचा काळ्या रंगाचा आय ३ विंडोजचा लॅपटॉप चोरुन नेला.
….
एका वर्षासाठी शहर-जिल्ह्यातून हद्दपार
नाशिक – शहर पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात अकबर उर्फ भुऱ्या सत्तार शेख (वय ३६, रसूलबाग कब्रस्थान खडकाळी) याला एका वर्षासाठी शहर-जिल्ह्यातून हद्दपार केले होते. असे असतांना शुक्रवारी (दि.१७) सकाळी दहाला तो भद्रकाली परिसरातील तलावाडी परिसरात मिळून आला.याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
…..
सुर्या हॉस्पीटल समोरुन दुचाकी चोरीला
नाशिक – पंचवटी परिसरात सुर्या हॉस्पीटल समोरुन चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली. संतोष निवृत्ती रणमाळे (वय २६, दत्तनगर, पंचवटी) यांनी त्यांची होंडासीबी शाईन दुचाकी (एमएच १५ जीपी ८१६३) सायबर कॅफे समोरील पार्किंग मध्ये दुचाकी पार्क केली असता चोरट्याने दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणीपंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत त्रिमूर्तीचौकात हेगडेवार नगरात भाउसाहेब दगू पाटील यांनी त्यांची बजाज डिस्कव्हरीदुचाकी (एमएच १५ बीआर ९१२२) त्यांच्या हेडगेवार नगर येथील घरासमोर लावली असता चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली.