नाशिक : पंचवटीतील शांतीनगर भागात राहणा-या एसटी कर्मचाऱ्यांने आज आपल्या राहत्या घरी औषधी गोळ्या आणि गळफास लावून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. आंदोलन नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशाल प्रकाश कुमावत (३५ रा. रामप्रसाद नगर शांतीनगर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. कुमावत यानी आंदोलनामुळे आर्थिक गणित कोलमडल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. कुमावत यानी मध्यरात्रीनंतर मोठ्या संख्येने सेवन केल्या त्यापाठोपाठ घरातील पंख्यावर दोरी बांधून गळफास लावून घेतला होता ही बाब वेळीच निदर्शनास आल्याने अनर्थ टळला. कुटुंबियानी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून अतिदक्ष विभागात ऊपचार सुरू आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे