नाशिक – झाड तोडल्याप्रकरणात एकावर म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक – पंचवटीतील रासबिहारी लिंक रोड परिसरातील नाल्याजवळील झाड तोडल्याप्रकरणात एकावर म्हसरुळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. वैभव रविंद्र वेताळ (वय २४, वल्लभ अपार्टमेंट राधाकृष्ण चौक, नांदूर) यांनी तक्रार केल्यानंतर सतीश गुलाबचंद अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन नोव्हेंबर सकाळी अकराच्या सुमारास तीन काटेरी बाभूळ, बुंधा लपेटीचे आठ मीटर उंचीचे वृक्ष बुंध्यापासून तोडल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला.
जुन्या भांडणातून तिघांनी एकाच्या डोक्यात लाकडी दांड्याने केली मारहाण
नाशिक – अंबडला दत्तनगर परिसरात जुन्या भांडणातून तिघांनी एकाच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी मुन्ना संत्री भारती (वय ३५, कारगील चौक दत्तनगर) यांच्या तक्रारीवरुन राकेश गौतम व त्याच्या दोघा मित्रांनी जुन्या भाडंणाची कुरापत काढून त्याच्या घरात घूसून डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केली. बुधवारी (ता.१५) साडे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.