नाशिक – रंगरेज मळ्यातील कार्यालयाचे कुलूप तोडले; चौघां विरोधात गुन्हा दाखल
नाशिक – इंदिरानगर परिसरातील रंगरेज मळ्यातील चौघा संशयितांनी कार्यालयाचे कुलूप तोडून त्यातील सामान बाहेर काढून फेकून नासधूस केल्याप्रकरणी चौघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरीफ यासीन पटेल यांच्या तक्रारीवरुन समीना जावेद रंगरेज (वय ३१), जावेद रफीक रंगरेज (वय ३५), सोनू रफिक शेख आणि जावेद अनवर रंगरेज यांच्या विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी आरीफ पटेल यांचे सल्लाउद्दीन रंगरेज यांच्या घरात कार्यालय आहे. मंगळवारी (ता.१४) सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.
जून्या भांडणातून चौघांनी केली एकाला मारहाण
नाशिक – जून्या भांडणातून चौघांनी एकावर मारहाण केल्याचा प्रकार नाशिक रोडला घडला आहे.याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोशा उर्फ साहील राजू मांगकाली (वय १७, रोकडोबावाडी) याच्या तक्रारीवरुन मेघराज सरोदे, फिरोज उर्फ रॉयल बाबा मंडपवाले, अकबरबाबा मंडपवाले यांच्यासह चौघांनी मंगळवारी (ता.१४) सायंकाळी साडे सातला जुन्या भांडणाच्या कुरापत काढून रॉयल इंटरप्रायझेस या दुकानात पोशाला बोलावून घेत लाकडी काठीने मारहाण केली.