नाशिक – गंगापुर पोलीस स्टेशन कडील चेन स्नॅचिंगचे पाच गुन्हे उघडकीस आले आहे. या गुन्हयातील बळजबरीने चोरी केलेला एकुण ४ लाख ९४ हजार ८५९ रु किंमीच्या ११ तोळे वजनाच्या सोन्याच्या लगडी व एक प्लेजर मोपेड स्कुटर २० रुपये किंमतीची असे एकुण ५ लाख १४ हजार ८५९ रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहेत.
पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिक शहरात चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणा-या इसमांचा शोध प्रभावीपणे प्रतिबंध करण्याचे व झालेले गुन्हे उघडकीस आणण्याचे सुचना दिल्या होत्या. त्यानंतर गंगापुर पोलीस स्टेशन हद्दीत ॲन्टी चेन स्नॅचिंग पेट्रोलिंग नेमुण त्यात पोलीस मित्र असलेल्या नागरीकांना समाविष्ट केलेले होते. सदर पोलीस मित्र यांना चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणा-या इसमांचे प्राप्त व्हिडीओ फुटेज व वर्णना बद्दल माहिती देण्यात आल्यानंतर हे गुन्हे उघडकीस आले. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रियाज शेख यांचे मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलीस स्टेशन कडील सपोनि प्रविण सुर्यवंशी, पोउनि संजय भिसे यांच्यासह पोलिस मित्रांनी ही कामगिरी केली.