नाशिक : संसरीगाव परिसरात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोकड चोरून नेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिष हरिदास सानप (रा.वैष्णव विहार सोसा.संसरीगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. सानप कुटुंबिय मंगळवारी (दि.१४) कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयडा तोडून कपाटातील सुमारे १८ हजार ५०० रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोरे करीत आहेत.