बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – अमृतधाम चौफुलीवर ट्रक कंटेनरच्या धडकेत एक ठार

by India Darpan
मे 19, 2021 | 6:47 am
in क्राईम डायरी
0
accident 2

ट्रक कंटेनरच्या धडकेत एक ठार
नाशिक : मालट्रक कंटेनरच्या धडकेत परप्रांतीय चालक ठार झाला. हा अपघात रस्ता ओलांडत असतांना महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मनोज कुमार (२२ रा.आाझमगड,उत्तरप्रदेश) असे अपघातात ठार झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. याप्रकरणी कंटेनर वरील क्लिनर सलूमुंद्दीन खान याने तक्रार दाखल केली आहे. अ‍ौरंगाबाद कडून तारवाला नगर रोडने भरधाव जाणा-या कंटेनरने (टीएस ११ युसी ६२६१) धुळे बाजू कडून महामार्गा वरून जाणा-या मालट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. चौफुलीवर रस्ता ओलांडणा-या मालट्रकला निघून जावू न देता मृत चालकाने आपला कंटेनर दामटल्याने कंटेनर मालट्रकच्या पाठीमागील बाजूवर आदळला. त्यात कंटेनरचालकाचा मृत्यु झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.

…..

गाय वासराची चोरी
नाशिक : शहारात पाळीव जनावरेही सुरक्षीत राहिले नसून चरण्यासाठी सोडलेले गाय वासरू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तारवाला नगर भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुदाम सखाराम कासार (रा.उदय कॉलनी,मखमलाबाद रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कासार यांनी रविवारी (दि.१६) आपली काठेवाडी क्रॉस जातीची ७० हजार रूपये किमतीचे गाय वासरू नेहमी प्रमाणे तारवाला नगर परिसरातील लामखेडे मळयातील मोकळया जागेत चरण्यासाठी सोडले असता अज्ञात चोरट्यांनी ते चोरून नेले. अधिक तपास जमादार ठाकरे करीत आहेत.

…..

सरकारी कामात अडथळा एकास अटक
नाशिक : कोवीड लस देण्याच्या कारणातून एकाने रूग्णालयात गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार पंचवटी कारंजा भागात घडला. याप्रकरणी पोलीस रेकॉर्ड वरील एका संशयीतास अटक करण्यात आली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृणाल भालचंद्र घोडके (३३ रा.लक्ष्मी प्राईड,टाकळीरोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी विजय मोतीराम देवकर (रा.उंटवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. ही घटना पंचवटी कारंजा येथील महापालिकेच्या इंदिरागांधी रूग्णालयात घडली. देवकर या रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक असून मंगळवारी (दि.१८) ते सेवा बजावत असतांना संशयीत तेथे आला. त्याने माझी आई व्हॅक्सीन घेण्यासाठी आली आहे. इतका वेळ लागतो का ? तुम्ही डॉक्टर माजले आहेत. असे म्हणून देवकर यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच धक्काबुक्की करून कोवीड साथ रोगाचे प्रतिबंधक महत्वाचे काम करीत असतांना सरकारी कामात व्यत्यय आणला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवळी करीत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – सिडकोत चाकू हल्ल्यात तरुण जखमी, दोघांना अटक

Next Post

कोविशील्डच्या डोसबाबत झाला हा मोठा खुलासा

India Darpan

Next Post
covideshild

कोविशील्डच्या डोसबाबत झाला हा मोठा खुलासा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011