नाशिक – येथील बोधले नगर परिसरात स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यानाच्या शेजारील विद्युतप्रवाह करणारे ट्रान्सफार्मर चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरात गुन्हेगारी वाढलेली असतानाच घरफोड्यांमध्ये भर पडली आहे…
अशातच आता चोरट्यांनी महागडे कॉपर वापरले जाणारे ट्रान्सफार्मर चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बडदे नगर परिसरात घडली. याठिकाणी महावितरण कंपनीच्या (MSEB) २५ किलो वॅटची सुमारे ७० किलो वजनाचे ट्रान्सफार्मर बसविण्यात आले होते. अंदाजे ४५ हजार रुपये किंमतीचे हे ट्रान्सफार्मर असल्याचे समोर आले आहे. विद्युत पुरवठा सुरू असलेले ट्रान्सफार्मर चोरी झाल्याप्रकरणी सहाय्यक अभियंता अजय बसनीवाल यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही