नाशिक – मुलीला फोन करु नको सांगितल्याचा राग; एकाने महिलेवर धारदार शस्त्राने केले वार
नाशिक – माझ्या मुलीला फोन करु नको असे सांगितल्याने त्याचा राग आल्याने एकाने महिलेवर वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उदय जयंत जगताप (वय १९, वाल्मीकनगर, पंचवटी असे संशयिताचे नाव असून त्याच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या प्रकरणात दोन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी करिना मनोज वर्मा (वय १९, हिच्या तक्रारीवरुन संशयिताविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी तक्रारदार व त्यांची आई दोघी सोमवारी (ता.६) रात्री साडे दहाला वाल्मीकनगर समाजमंदीर परिसरात शतपावली करीत असतांना युवतीची आई लता वर्मा यांनी रस्त्यात आडवा आलेल्या संशयिताला हटकत माझ्या मुलीला फोन करीत जाऊ नकोस असे सांगितले त्याचा राग आल्याने संशयिताने धारदार शस्त्राने वार करीत जखमी केले.
शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून मारहाणीचा प्रकार
नाशिक – गुरुच्या आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून चार पाच जणांनी मारहाणीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी डॉली अचल बर्वे (वय २९, गुरुमाउली रो हाउस, पिंपळपट्टी नाशिक रोड) यांच्या तक्रारीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आडगाव शिवारात राजवाडा परिसरात गुरुवारी (ता.९) साडे बाराच्या सुमारास आशा जाधव, बाळू पन्नालाल जाधव यांच्यासह चार पाच जणांनी तक्रारदार डॉली बर्वे यांच्या गुरुच्या आईला शिवीगाळ केल्याने त्या विचारायला गेल्या असता, लोखंडी गजाने मारहाण केली. त्यात, मोबाईल ब्रेसलेट, गहाळ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.