नाशिक – संभाजी स्टेडीयममध्ये विना परवानगी क्रिकेट स्पर्धा; अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत राजे संभाजी स्टेडीयममध्ये विना परवानगी क्रिकेट स्पर्धाच्या आयोजनावरुन पोलिसांनी अभीजीत अरुण सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस सचीन देवराम सोनवणे (वय ४३, ) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी संशयित अभिजित सोनवणे याने गुरुवारी (ता.९) अश्विननगरला संभाजी स्टेडीयम परिसरात चाळीस पन्नास जणांची गर्दी जमवून मयार्दीत षटकांच्या क्रिकेट स्पर्धा भरविल्या स्पधेर्साठी पोलिसांची कुठलीही परवानगी घेतली नाही. यावरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दोन दुचाकी चोरीला
नाशिक – शहरात वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरुन नेल्या. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. पहिल्या घटनेत राजू दत्तू चौधरी (वय ३३, उत्तमनगर सिडको) यांनी त्यांची काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ डीए ४४४६) घरासमोर लावली असतांना सोमवारी (ता.६) रात्रीतून चोरट्याने चोरुन नेली. अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या घटनेत दर्शन संजय देवरे (वय २५, उपेंद्रनगर सिडको) सातपूर परिसरातील सायटर इन्फार्मेशन कंपनीच्या गेटबाहेर त्यांची दुचाकी (एमएच १५ बीएस ६५८) उभी केली असता २६ नोव्हेंबरला रात्रीतून चोरट्यांने पार्किंगमधून दुचाकी चोरुन नेली.