नाशिक – मुलीची छेड काढल्याच्या कारणावरुन तिघांनी केली एकाला बेदम मारहाण
नाशिक – पिंपळगाव बहुला (सातपूर) भागात मुलीची छेड काढल्याच्या कारणावरुन तिघांनी एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी पंढरीनाथ घुगे (वय ४०) सिध्देश गुंबाडे व त्यांचा मित्र या तिघांनी बुधवारी (ता.८) दुपारी साडे बाराच्या सुमारास मुलीची छेड काढल्याच्या कारणावरुन आर्यन किरण गांगुर्डे याला लाथा बुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकरमधून २५ हजाराची रोकड आणि सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास
नाशिक – वडाळा रोड भागातील काझीनगर परिसरात चोरट्याने घरात प्रवेश करीत सुमारे ४५ हजाराचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इम्रान खलील शेख (वय ३८, निझाम रेसिडेन्सी, काझीनगर वडाळा रोड) यांच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी बुधवारी (ता.८) सहाच्या सुमारास चोरट्याने घरात प्रवेश करीत घरातील गोजरेज लॉकरमधून २५ हजाराची रोकड आणि सोन्याची पोत चोरुन नेली. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख तपास करीत आहे.