नाशिक – जेहान सर्कल ते एबीबी सर्कल दरम्यान अशियाना बंगल्यासमोर भरधाव मद्यपी दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. शुभम ताराचंद पाटील (वय २३, श्रमसाफल्य कॉलनी, गोंधूर रोड बलवाडी (जि.धुळे) असे मृत चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अनुष्का तुषार महाजन (वय २३, साई एम्पायर कोणार्कनगर ) यांच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी बुधवारी (ता.८) अडीचच्या सुमारास दारु पिऊन भरधाव वेगाने दुचकी चालवून अभियाना बंगल्या समोरील रस्त्याच्या कडेला झाडावर आदळून त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.एस.भिसे तपास करीत आहे.