नाशिक : किराणामाल घेऊन घराकडे पायी परतणा-या पुणे पेथील महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या भामट्यानी ओरबाडून नेली. ही घटना शिवाजीनगर भागात घडली.याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली विनायक गुरसळ ( रा.पिपरी चिंचवड,पुणे) यानी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुरसळ या काही दिवसांच्या वास्तव्यासाठी शहरात आल्या आहेत. रविवारी (दि.५) सायंकाळी त्या किराणामाल खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. शिवाजीनगर येथील बस स्टॉप जवळील परि एन्टरप्राईजेस जवळून त्या खरेदी करून आपल्या घराकडे पायी जात असताना काही अंतरावर च समोरून दुचाकीवरून आलेल्या भामट्यानी त्याच्या गळ्यातील ६२ हजार ५०० रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.