नाशिक : अनधिकृतपणे घरात घुसलेल्या एकाने पती,सासरे व मुलास मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना जेलरोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल अरविंद कपोते (४० रा.सैलानीबाबा जवळ,जेलरोड) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी नारायण बापू नगर भागात राहणा-या विवाहीतेने तक्रार दाखल केली आहे. गेल्या रविवारी (दि.१४) महिलेचे कु्टुंबिय घरात असतांना संशयीताने अनधिकृतपणे घरात प्रवेश केला. जुन्या वादाची कुरापत काढून संशयीताने पती, सासरे आणि मुलास मारहाण करीत महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास हवालदार परदेशी करीत आहेत.