नाशिक : शहरातील एका महिलेचा भामट्यांनी मेल आयडी हॅक केल्याची बाब समोर आली आहे. मेलवर वैयक्तीक डाटा असल्याने गैरवापर टाळण्यासाठी महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतधाम भागात राहणा-या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. महिलेचा मेल आयडी अज्ञात भामट्यांनी गैरमार्गाने अॅक्सेस घेवून त्याचा रिकव्हरी मोबाईल क्रंमाक व मेल आयडी बदल करून हॅक केला आहे. ही बाब १ नोव्हेंबर रोजी निदर्शनास आल्याने तसेच याच मेलवर वैयक्तीक डाटा असल्याने गैरवापर टाळण्यासाठी महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.