नाशिक : शिकवणीसाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना जेलरोड भागात घडली. कुणीतरी मुलींना पळवून नेल्याचा संशय कुटूंबियांनी व्यक्त केल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजराजेश्वरी मंगल कार्यालय परिसरात राहणा-या महिलेने तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या मुलीस सोमवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास तिची मैत्रीण शिकवणीसाठी बोलविण्यास आली होती. दोघी मैत्रीणी शिकवणीस जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या त्या अद्याप परतल्या नाही. सर्वत्र शोध घेवूनही त्या मिळून न आल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून त्यांना कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.