नाशिक : बांधकाम सुरू असलेल्या साईटवर ग्रेनाईट शिट अंगावर पडल्याने मजूराचा मृत्यु झाल्याची घटना पाथर्डी फाटा भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. जयप्रकाश पंडीत (रा.सातपूर कॉलनी) असे मृत कामगाराचे नाव आहे. पंडीत मंगळवारी (दि.२३) पाथर्डी फाटा भागात सुरू असलेल्या आदिनाथ बिल्डर्सच्या साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. वरिल माळयावरून अचानक मोठी ग्रेनाईट शिट अंगावर पडल्याने पंडीत गंभीर जखमी झाले होते. या घटनेत त्यांच्या मांडीस,खुब्यास,डोक्यास पोटास व छातीस मार लागल्याने सुद्दाम हुसेन यांनी त्यांना तात्काळ नजीकच्या बोरा हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.