नाशिक : विवाहबाह्य संबंधाबाबत जाब विचारल्याने राग अनावर झाल्याने पतीने पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पुण्यातील संशयित पती दिलीप अशोक खानवलकर, सासरे अशोक गोपाल खानवलकर, सासू पुष्पा अशोक खानवलकर, नणंद भारती अशोक खानवलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विवाहिता सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. लग्न व्यवस्थित केले नाही. लग्नात मानपान दिला नाही. लग्नात जेवण व्यवस्थित नव्हते. सोने कमी दिले. उरलेले एक लाख रुपये दिले नाहीत, असे म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण व मानसिक त्रास दिला. पतीने विवाहितेवर अनैसर्गिक अत्याचार केला. पतीचे विवाहबाह्य शारीरिक संबंधाची माहिती विवाहितेला समजली. तिने पतीकडे विचारणा केली असता पतीने तिलाच मारहाण केली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेला मुलीसह घराबाहेर काढले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेंडकर करत आहेत.