नाशिक – मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे नगरसेविकेसह तिघांवर गुन्हा दाखल
नाशिक : पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत नगरसेविकेसह तिघांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमविल्याची घटना हृदयेश्वर महादेव मंदिर, श्रमिक नगर, सातपूर येथे घडली. याप्रकरणी पोलीस अंमलदार किशोर भदाणे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी नगरसेविका हेमलता कांडेकर, दिनकर कांडेकर, करण गायकर, अविनाश गायकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आयोजकांनी कोविड योद्धा सन्मान सोहळा व दिवाळीनिमित्त घेतलेल्या ऑनलाइन रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांसाठी सत्कार सोहळ्याची पोलिसांकडे परवानगी मागितली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही, आयोजकांनी पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत गर्दी जमविली. या ठिकाणे अनेकजण विनामास्क पोलिसांना दिसून आले. पुढील तपास पोलीस हवालदार भड करत आहेत.
विनापरवानगी गर्दी; पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे
नाशिक : शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विनापरवानगी गर्दी केली. याप्रकरणी पोलीस नाईक प्रफुल्ल जाधव यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजू देसले, हंसराज वडघुले, निवृत्ती अरिंगळे, विराज देवांग, तल्ला शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राजू देसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी गर्दी केली. नाशिपुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडवी करत आहेत.