नारायण बापू नगरमध्ये चार जणांच्या टोळक्याचा धुडघूस; महिलेच्या घराच्या खिडकींच्या काचा फोडल्या
नाशिक : नारायण बापू नगर भागात चार जणांच्या टोळक्याने धुडघूस घातल्याचा प्रकार रविवारी (दि.२१) घडला. या घटनेत एका महिलेच्या घराच्या खिडकींच्या काचा फोडण्यात आल्या तर दुसरीच्या घरात घुसून टोळक्याने तोडफोड केली. ही घटना शेजारी महिलेचा नातेवाईक घरात लपून बसल्याच्या सशयातून घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋतिक पगारे,छब्या,गोट्या आणि त्यांचा एक साथीदार अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी विद्या साळवी या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार साळवी यांच्या घरासमोर राहणा-या नुतन जाधव यांचा नातेवाईक असलेला अभय पगारे हा साळवी यांच्या घरात लपून बसला असल्याच्या संशयातून ही घटना घडली. रविवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास संशयीत टोळक्याने जाधव यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडत साळवी यांच्या घरात अनधिकृत पणे प्रवेश केला. या वेळी संतप्त टोळक्याने घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून देत तसेच तोडफोड करीत मोठे नुकसान केले. अधिक तपा हवालदार लोहकरे करीत आहेत.
विषारी औषध सेवन करून आत्महत्या
नाशिक : महामार्गावरील एक्स्लो पॉईंट भागात राहणा-या २२ वर्षीय तरूणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र पोलीस भरतीच्या पेपरमध्ये कमी मार्क्स मिळाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राहूल भानुदास चांगुळे (रा.रामसेतू,आठवले नगर) असे आत्महत्या करणाºया तरूणाचे नाव आहे. राहूल याने रविवारी (दि.२१) याने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात उंदीर मारण्याचे विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यास तात्काळ सुदर्शन हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. दरम्यान राहूलने पोलीस भरतीची परिक्षा दिली होती. त्यात कमी मार्क्स मिळाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.