नाशिक : बिल्डींगचे पाणी सोडणा-या कामगाराने त्याच इमारतीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. याप्रकरणी पोलीस दप्तपी बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मोसिन शेख असे संशयीताचे नाव असून याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत अल्पवयीन मुलगी राहत असलेल्या बिल्डीगचे पाणी सोडण्याचे काम पाहतो. मुलीशी ओळख वाढवून त्याने अज्ञान पणाचा फायदा उचलत तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने बलात्कार केला. गेल्या वर्ष भरापासून तो हे कृत्य करीत होता. ही बाब पीडितेच्या कुटुंबियाच्या लक्षात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सय्यद करीत आहेत.