नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून नुकत्याच चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी भद्रकाली,सरकारवाडा आणि उपनगर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकलहरा रोड भागात राहणारे नागेश पारखे (रा.रेल्वे ट्रॅक्शन समोर) हे गेल्या रविवारी (दि.७) ठक्कर बाजार परिसरात आले होते. बसस्थानकर परिसरात त्यांनी आपली दुचाकी एमएच १५ इवाय १०१९ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक साबळे करीत आहेत. दुसरी घटना द्वारका परिसरात घडली. विकास शंकर देवगिरे (रा.पिंपळगाव घाडगा ता.इगतपुरी) हे शुक्रवारी (दि.१९) झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे आले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची ग्लॅमर दुचाकी एमएच १५ सीयू ६०७७ चोरट्यांंनी पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. तर बोधलेनगर येथील बनकर मळयात राहणारे संदिप दयाराम जाधव (रा.रामचंद्र अपा.आरटीओ कॉलनीरोड) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ जेक्यू ८५०७ दुचाकी गेल्या १५ आॅगष्ट रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. दुसरी घटना शिखरेवाडी येथील पासपोर्ट आॅफिस भागात घडली. राजेंद्र रामचंद्र जाधव (रा.नेहा पार्क अपा.) यांची एमएच १५ एफसी २५५४ ही दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी चोरीस गेली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास जमादार गोसावी आणि गांगुर्डे करीत आहेत.