नाशिक – बिटको रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी भाजप नगरसेविका सीमा ताजने यांचे पती कन्नू ताजणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ . अतुल विजय सोनवणे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, राजेंद्र ( कन्नू ) ताजणे यांनी ईनोव्हा कार ( एमएच १५ – ईई ७७ ९९ ) वेगाने पोर्चच्या काचा फोडून नवीन बिटको रुग्णालयात घुसवली व शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. तसेच स्टाफ व नर्स यांच्यावर पेव्हर ब्लॉक फेकून मारत शासकीय कामकाजात अडथळा आणला . तसेच तेथे उपस्थित रुग्णाचे नातेवाईक देवा मल्हारी बोडके यांना चापटीने मारहाण तसेच शिवीगाळ व दमदाटी करत दहशत पसरवली . या तक्रारीन्वये कन्नू ताजणेविरुद्ध भादंवि कायदा कलम ३५३ , ३३६ , ३२३ , ५०४ , ५०६ , ४२७ , १८८ , सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम १ ९ ८४ चे कलम ३ , महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था हिंसक कृती अधिनियम २०१० चे कलम ४ , अधिनियम २०२० चे कलम ३,६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली तपास करत आहेत .