नाशिक : मालेगाव येथून मुंबईच्या दिशेने ट्रकमधून बेकायदा गोमांस वाहतूक करणा-या तिघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीतांच्या ताब्यातून सहा चाकी मालट्रक व गोमांस असा सुमारे १० लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निहाल इलियास खान (रा.कमलपुरा,मालेगाव),जावेद खलिल सय्यद (रा.पवारवाडी,मालेगाव) व सुफियान अबुझार गफारी (रा.इस्लामाबाद,मालेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी भद्रकालीचे पोलीस नाईक उत्तम पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. मालेगाव येथून मुंबईच्या दिशेने ट्रकमधून गोमासाची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.१४) महामार्गावरील टॅक्टर हाऊस भागात सापळा लावण्यात आला होता. एमएच २४ जे ७९८६ या सहा चाकी मालट्रकची तपासणी केली असता त्यात बेकायदा गोमांस आढळून आले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.